आम्ही सत्ताविशी पार करताक्षणीच ’या वर्षी तुझे लग्न झालेच पाहिजे’ असे आमच्या पालकांनी जाहीर केले आणि आम्हाला ’मुली पहाणे’ या कार्यक्रमाला नाईलाजाने सुरूवात करावी लागली. (बाकी सध्याचे स्त्रीमुक्तीचे दिवस आणि या कार्यक्रमाला आलेले स्वरूप पाहता त्याला मुलींचा ’मुले पहाणे’ कार्यक्रम असे म्हणणेच योग्य ठरेल, पण तो विषय वेगळा.) तेव्हा मुली पाहणे ठरल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आमच्या जातीतल्या लग्नाळू मुलींची यादी कुठूनतरी पैदा करण्यात आली आणि तिच्यातल्या सुंदर पोरींच्या नावांवर टीकमार्क करत त्यांना फोनाफोनी सुरू झाली. त्यातल्या एखाद्या मुलीचे लग्न ठरल्याची सुवार्ता मिळे, पण असा प्रसंग विरळाच, त्यापैकी बहुतेकींची लग्ने अजून व्हायचीच होती. अचानक, का कोण जाणे, पण लग्न जमवणा-या संकेतस्थळांवरच्याही मुली पहाव्यात अशी टूम निघाली आणि मला नाईलाजाने तिथेही नाव नोंदवावे लागले. हा लेख म्हणजे या संकेतस्थळांवर मला आलेल्या दुर्दैवी अनुभवांचीच शिदोरी आहे.
दोन महिने या संकेतस्थळांवर घालवल्यावर मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की इथे मुलींचे फक्त दोनच प्रकार असतात. १) अशा मुली ज्यांमधे तुम्ही रस दाखवता पण ज्या तुमच्याकडे ढुंकुनही बघत नाहीत २) अशा मुली ज्या तुमच्यात रस दाखवतात पण ज्यांच्याकडे तुम्ही ढुंकुनही बघत नाही. (हा आता तुम्हाला ज्यांच्यात रस नाही नि त्यांनाही तुमच्यामधे रस नाही अशा मुलींचा एक तिसरा गट असतो, पण आपण तूर्त त्याकडे दुर्लक्ष करू!) मग पहिल्या गटात कोण येतात? तर अप्सरा मुली! या मुली (अर्थातच) दिसायला सुंदर असतात, चांगल्या शिकलेल्या असतात नि हटकून पुणे किंवा मुंबई अशाच शहरांमधल्या असतात. आयटीतल्या असल्यामुळे ह्यांना पगार चांगले असतात आणि ह्यांचे वडील/बंधूही(We live in a 'close knit' family...) एखाद्या मोठ्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करणारे असतात. तर तुम्ही ह्यांना पाहून खूश होता, जरा चेकाळता नि नंतर मनातल्या मनात मिटक्या मारत ’एक्सप्रेस इंटरेस्ट’ बटन दाबता. बास, संपला विषय! तुम्ही एक दिवस वाट पहाता, दोन दिवस वाट पहाता नि मग एका आठवड्याने काय समजायचे ते समजून जाता. नेमके काय घडते इथे? ह्या सुंदर कन्यकेला दररोज ५ ते १० मजनू मागणी घालत असतात, त्यापैकी एक तुम्ही असता. ती मग तुमचे पान उघडते, एकदा तुमच्या (फोटो)कडे, एकदा तुमच्या पगाराकडे पहाते नि ’हं..हं..’ असे हसून पुढच्या मजनूकडे वळते. पण तुम्हाला नकार न देण्याइतका मुत्सद्दीपणा तिच्याकडे असतो. ह्याची दोन कारणे असतात - पहिले म्हणजे तुम्हाला लटकून ठेवण्याची मजा तिला घेता येते नि दुसरे म्हणजे भविष्यात जर काही अतर्क्य घडामोडी घडल्या (जसे की तुम्हाला अचानक ५० कोटींची लॉटरी लागली) तर तुमच्या मागणीला होकार देण्याचा पर्याय ती मोकळा ठेवू शकते!
दुसरा गट असतो तो तुमच्यामागे लागणा-या मुलींचा. ह्या मुलीही सुंदर असतात, पण असे तुमच्या आईचे मत असते. तुम्हाला काही त्या ’इतक्या’ सुंदर वाटत नाहीत. ह्या शिकलेल्याही कमीच असतात नि नोकरी करत असतील तर तीही असते एखादी साधीशीच. प्रोफाईलची सुरूवात करताना त्या नेहमी ’हॅलो, मायसेल्फ कल्पना...’ अशीच करतात (मायसेल्फ या शब्दावर कायद्याने बंदी आणली पाहिजे!) आणि त्यांच्या प्रोफाईलमधे ’होमली’ हा शब्द कमीतकमी तीनदा तरी असतोच. ’I like listening music/born and brought up in Sangli/looking for a sutaible person' ही यांच्या प्रोफाईलमधली काही नेहमीची वाक्ये. तुमच्यात एका मुलीने रस दाखवला आहे हा संदेश वाचून तुम्ही संकेतस्थळावर जाता आणि ही मुलगी पहाताच तुमचे विमान क्षणात ३० हजार फुटावरून १०० फुटावर येते. (अर्थात हे मात्र खरे, ह्या मुलींना कितीही नावे ठेवलीत तरी तुमचे लग्न अशाच एखाद्या मुलीशी होणार हे तुम्हाला एव्हाना पुरते कळून चुकलेले असते!)
तीन महिने संकेतस्थळांवर चिक्कार मुली पाहिल्यानंतर (आणि प्रचंड विचारमंथन केल्यावर) मी खालील निष्कर्षांप्रत पोचलेलो आहे.
१) लग्न जमवण्यासाठी संकेतस्थळांचा काडीचाही उपयोग नाही. त्यांचा वापर करून लग्न जमलेला/जमलेली एकही ईसम/स्त्री मी माझ्या आख्ख्या आयुष्यात पाहिला/ली नाही. किंबहुना या संकेतस्थळांच्या जाहिरातीत दिसत असलेली जोडपीही बनावट आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
२) आयटीतला माणूस म्हणजे लग्नाच्या बाजारातला भारी माल, म्हणून त्याला गोरी/देखणी बायको मिळणारच हे समीकरण पूर्णपणे चुकीचे आहे. हे समीकरण ज्याने रूढ केले त्या माणसाला एका खोलीत बंद करून हिमेशची सगळी गाणी पुन्हापुन्हा ऐकण्याची शिक्षा द्यायला हवी.
३)एका संकेतस्थळावर नकार मिळाल्यावरही त्याच मुलीला पुन्हा दुस-या संकेतस्थळावर संदेश टाकल्यावर ती कंटाळून कदाचित तुम्हाला हो म्हणेल असा जर तुमचा समज असेल तर तो एक गोड गैरसमज होय.
४)आमच्यासारख्या रुपाने सामान्य मुलांसाठी सरकारने काही कठोर कायदे करायला हवेत. म्हणजे ह्या सुंदर मुली सुंदर मुलांशी लग्न करणार आणि आमच्यासारखी रुपाने सामान्य मुले राहिलेल्या मुलींशी. सुंदर जोडप्यांना सुंदर मुले होणार आणि सामान्य जोडप्यांना सामान्य. हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी? असे चालू राहिले तर दिसायला एकदम सुंदर नि आमच्यासारखे सामान्य अशा दोनच प्रजाती जगात शिल्लक राहतील, सरकारला ही गोष्ट भितीदायक वाटत नाही का?
तेव्हा मित्रहो, ह्या संकेतस्थळांच्या नादी लागणे सोडा आणि आपल्या आजूबाजूला दिसणा-या पोरींपैकी एखादी सुबक ठेंगणी पटवायचा प्रयत्न करा. कसें?
Subscribe to:
Post Comments (Atom)
आयटीतला माणूस म्हणजे लग्नाच्या बाजारातला भारी माल, म्हणून
ReplyDelete.... हा मुद्द झक्कास एकदम !
तिन्ही गटात न बसणारी एकच मुलगी असते आणि तिलाच शोधायचं असतं भाऊसाहेब. आमचं असंच प्रोफाईल धुंडाळून धुंडाळून परवाच ठरलं.ती सापडल्यावर बघा कशी गंमत वाटते ते. सुंदर बायको योगायोगाने मिळालेली आहे. सामान्य-सुंदर असेही विवाह होतात !
आपण लीहलय ते १०० टक्के खर आहे. मस्त लेख जमलाय.
ReplyDeletemaze lagn online mulgi baghun zale. marathimatrimony.com
ReplyDeletefakt mahiti mhanun ha ullekh.
mastach lihiley sahi aahe
ReplyDeleteआपल्या आजूबाजूला दिसणा-या पोरींपैकी एखादी सुबक ठेंगणी पटवायचा प्रयत्न करा. .... हे मात्र १००% खरे, by the way.. r u married yet or still waiting
ReplyDeleteAnonymous : तुम्हाला शुभेच्छा!
ReplyDeletesudhirkeskar, Snehal : धन्यवाद.
Anonymous2 : हा हा हा, मजा आहे राव तुमची!
प्रसिक : मी अजूनही अविवाहित आहे!
ekdam jakkas....
ReplyDeleteshabdan shabd khara aahe yatla...
Being a life member on such matrimony profile for the last 5 years, i can add...
ReplyDeleteOne of the 'executive' (read executive assistant) girl had written in her broken english... "I am good at cocking and dancing..." well she meant cooking maharashtrian food :-)
mastch faar chhan lihlay ...
ReplyDeletekhoop chaaan..! ekdam awesome ...!!!!
ReplyDeleteखूपच मार्मिक पण अतिशय सुंदर मस्तच
ReplyDeleteझकास......... आवडला....! :)
ReplyDeleteपु.ले.शु.