कुणाचाही मृत्यू (मग तो माणूस कितीही सामान्य का असेना) एक दु:खद घटना असते; नुकताच झालेला स्टीव जॉब्जचा मृत्यूदेखील त्याला अपवाद कसा असणार? पण त्याच्या मृत्युला मिळालेली प्रसिद्धी पाहून आणि त्याच्या स्तुतीने भरलेले रकानेच्या रकाने पाहून मी खरोखरीच आश्चर्यचकीत झालो. मेलेल्या माणसाबद्दल अशी चर्चा योग्य नव्हे, त्यामुळे ह्या लेखाचा विषय काही लोकांना आवडणार नाही; पण माझा प्रश्न असा आहे, स्टीवच्या मृत्युमुळे एवढा गजहब होण्याइतके खरेच त्याचे मानवजातीला योगदान मोठे होते?
स्टीव हा एका प्रसिद्ध कंपनीचा तिच्याहून प्रसिद्ध सर्वेसर्वा होता. पण सवाल असा आहे, स्टीवचे या जगाला योगदान काय? त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय? आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय? मला वाटते या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. स्टीवचे काम त्याच्या कंपनीपुरतेच मर्यादीत होते आणि ते सारे या कंपनीचा नफा वाढवायचा ह्याच हेतूने झालेले होते. बरे, नफ्याचे सोडा, तो तर प्रत्येकच कंपनीला कमवायचा असतो; पण उत्पादने बनवताना सामान्य लोकांना समोर ठेवून काम केले तर समाजसेवा करता येतेच की. याचे एक उत्तम देशी उदाहरण 'जमशेदजी टाटा' तर एक चांगले विदेशी उदाहरण म्हणजे 'हेन्री फोर्ड'. टाटांच्या नॅनोसारखे एखादे उत्पादन स्टीवने तयार केले असते तर ती वेगळी गोष्ट, पण त्याची सगळी उत्पादने श्रीमंतांसाठी बनवलेली होती (नि आजही आहेत). स्टीवने प्रचंड प्ररिश्रम घेतले नि आपली कंपनी पहिल्या क्रमांकावर नेली हे मान्य, पण ते श्रम फक्त त्याच्या नि कंपनीच्या भल्यासाठी होते हे मान्य करण्यात काहीही अडचण नसावी. एखाद्या कंपनीचा अध्यक्ष मोठे कष्ट उपसून आपल्या कंपनीला नवजीवन देतो ही गोष्ट कौतुकास्पद असेल, पण त्यात विशेष काय?
स्टीवने बनवलेली उत्पादने वेगळी, चांगली असतील पण समजा ती बाजारात आली नसती तर जगाला काय फरक पडला असता? ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल? स्टीवच्या मृत्युला मिळालेली ही प्रसिद्धी मला जास्त टोचली ती एका बातमीमुळे. ही बातमी म्हणजे 'सी' या संगणक भाषेचा निर्माता 'डेनिस रिची' याच्या निधनाची. या भाषेच्या निर्मितीबरोबरच 'युनिक्स' (जिच्यापासून पुढे लिनक्स बनली), 'मल्टिक्स' या संगणक प्रणालींच्या निर्मितीतही रिची यांचा महत्वाचा सहभाग होता. किंबहुना रिची नसते तर जॉब्ज घडलेच नसते [http://www.zdnet.com/blog/perlow/without-dennis-ritchie-there-would-be-no-jobs/19020] असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. पण नेहमी चमचमाटाकडेच लक्ष देणा-या माध्यमांनी स्टीवच्या मृत्युची बातमी पहिल्या पानावर छापून डेनिस रिचीच्या जाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे हे काहीसे अपेक्षितच आहे, नाही का?
आता 'ऍपल मला अजिबात न आवडणारी कंपनी आहे' किंवा 'स्टीव माझा अत्यंत नावडता माणूस होता' असं असल्यामुळे मी हा लेख लिहिला असं काही लोक म्हणतील, पण तसं काही नाही. स्टीवच्या जाण्यामुळे अश्रू ढाळणा-या लोकांना मला एवढंच विचारायचं आहे, मानवजातीवर उपकार करणा-या महामानवांच्या मृत्युचा शोक आपण करतो; स्टीव जॉब्जला खरंच या यादीत बसवता येईल?
Subscribe to:
Post Comments (Atom)
मस्त ! ! :) :)
ReplyDeleteतुला टच इन्टरॅक्शन काय आहे ते समजलेच नसावे. युजर इंटरॅक्शन काय अस्ते ते स्टिव्ह ने बदलून टाकले आहे. बिल नेही त्याच्याच कंपनीसाठी काम केले. नारायणमूर्तींनी सुद्धा तेच केले. तर सांगायचा मुद्दा आहे की सगळे आपल्या कंपनीसाठी काम करतात. सामाजिक मुद्दा मह्त्त्वाचा मानायचा की टेक्नॉलजीकल कॉंट्रिब्युशन हा प्रत्येकाचा प्रश्न.
ReplyDeleteस्टीव जॉब्जने जे प्रोडक्ट बनवले ते निश्चितच महागडे आहेत, पण आज तू पण टच-स्क्रीन मोबाईल वापरतच असशील, मोबाईलला टच देणे, हाय-डेफिनेशन व्हिडीओज, हे सगळे स्टीव्ह च्या संकल्पनेतून जन्माला आले आहे, तूच म्हणल्याप्रमाणे बिल गेटसची विंडोजची संकल्पना सुद्धा स्टीव्ह जॉब्ज ने दिलेली प्रेरणा आहे. भविष्यात जे काही Tablet phone चे युद्ध चालू होणार आहे ते सुद्धा आय आय -पॅड या संकल्पनेतूनच आलेले आहेत, आपला आकाश हा सुद्धा स्टीव्ह जॉब्ज च्या संकल्पनेतून आलेला आहेत. तसे पाहायला जाल तर मर्सिडीज, रोल्स-रॉयास यासारख्या अति-महागड्या गाड्यांचा काहीच उपयोग नाही, याचा अर्थ असा नाही कि त्यांचा समाजाला काहीच उपयोग झाला नाही
ReplyDeleteतेव्हा ब्लॉग टाकताना उणे-दुने यांचा विचार करूनच टाकावा, फक्त आपल्याला परवडत नाही म्हणून त्याच्या विरुध्ध लिहिणे योग्य नाही...
ग्रॅहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले....तसे स्टीव्ह जॉब्सने अॅप्पलसारखी कंपनी स्थापन केली जी रोजच्या वापरातील उपकरणांना अद्ययावत रूप देते. टेलिफोनचा शोध लागला म्हणून जग नाही बदलले, टेलिफोन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने बदलले. अॅप्पल एखाद्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावते, त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करते. साहजिकच आहे, अॅप्पलची उपकरणे महाग असणारच. पण एखाद्या नवीन तंत्रज्ञानाला जेव्हा अॅप्पल आपल्या उपकरणांत सामील करते तेव्हा तो बाकीच्यांसाठी आदर्श असतो. त्यांची नक्कल करून बाकी सगळे आपली उपकरणे अद्ययावत करतात. Research & Development cost वाचत असल्याने त्यांना त्यांची उपकरणे स्वस्तात देणे परवडते.
ReplyDeleteकधी विचार केलाय - नोकिया भारतात इतकी हिट का आहे ते? युरोप/अमेरिकेत आलेले फोन/तंत्रज्ञान मूळ कंपनीने भारतात आणण्यापूर्वी नोकिया त्याची नक्कल करून स्वतःची उपकरणे बनवते आणि स्वस्तात भारतीय बाजारात काढते. गुगल करून बघा. आणि मग जेव्हा नोकियाचे फोन वापराल, तेव्हा स्टीव्ह जॉब्सबद्दल असे काही बोलून बघा...
तुमचे हे लिखाण तुमच्या ब्लॉगचे नाव सार्थ करते - अरभाट आणि चिल्लर....
योग्य लिहिले आहे... स्टीव्ह च्या कर्तुत्वा बद्दल शंकेच कारण नाही आहे ... पण लेखात मांडलेली भूमिका मला योग्य वाटली ... C नसती तर आज आज हे तैप करणारे पण नसते ... आणि 'टेलिफोन हा महत्वाचा शोध नव्हता तर तो सामान्यांच्या आवाक्यात आणून देणाऱ्याला जास्त महत्व आहे' ह्या प्रतिक्रियेवर मी हसलो...
ReplyDeleteइथे मिडीयाने काय केल हे महत्वाच आहे ...